मंगल भावना © (मराठी)

1024 576 admin
मंगल भावना © (मराठी)
रचयिता - मुनि श्री 108 प्रमाणसागर जी महाराज

मंगल भावना ©

मंगल मंगल व्हावे जगती, सारे मंगल व्हावे ।
धरतीच्या प्राणीमात्राचे, मन मंगलमय व्हावे ॥

क्लेशाचा लवलेश नुरावा, दुःख कुठेच नसावे ।
मनात चिंता भय न छळावे, रोग शोक ना व्हावे ॥
नको वैर अभिमान न चित्ती, क्षोभ कधी ना यावा ।
प्रेममैत्र सद्भाव जपत हे, मन मंगलमय व्हावे ॥
मंगल – मंगल…

क्रोध मनीचा विरून जावा, अंतर उज्ज्वल व्हावे ।
राग द्वेष अरू मोह सारूनी ,आतम निर्मल व्हावे ॥
प्रभुचे मंगल गीत म्हणावे, पापाचा क्षय व्हावा ।
जगातील प्रत्येक जिवाचे, प्रतिदिन मंगल व्हावे ॥
मंगल – मंगल…

गुरुही मंगल प्रभुही मंगल, धर्म सुमंगल व्हावा ।
मायपित्याचे जीवन मंगल, परिजन मंगल व्हावा ॥
जनामनाचे मंगल मंगल , मंगल ही समूहाचे ।
राजा प्रजा धरा अवघी ही ,सर्व धर्ममय व्हावे ॥
मंगल – मंगल…

उषःकालही मंगल अमुचा, रात्र सुमंगल व्हावी ।
जीवनात प्रत्येक क्षणाला ,मंगलता वाढावी ॥
घरोघरी मंगलता यावी,जन मन मंगल व्हावे ।
या मातीचा कणकण पावन,जग मंगलमय व्हावे॥

दोहा
मंगल भाव असो जगी, सरो अमंगल भाव ।
भावना प्रमाण ही, हृदयी हो सद्भाव

© 2023 मंगल भावना is a copyrighted material

Share

Leave a Reply